महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

COVID-19: मुंबईत 40 लाखांचे मास्क अन् सॅनिटायझरचा साठा जप्त.. - MUMBAI CRIME NEWS

राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी साबणाने, सॅनिटायझरने हात धूवावे असे सांगितले जात आहे. त्यामुळे अचानक बाजारात बाजारात सॅनिटायझर व मास्कची मोठी मागणी वाढती. मात्र, त्याचा पुरवठा कमी झाला.

masks-and-sanitizer-stock-seized-in-mumbai
masks-and-sanitizer-stock-seized-in-mumbai

By

Published : Apr 7, 2020, 12:53 PM IST

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी साबणाने, सॅनिटायझरने हात धूवावे असे सांगितले जात आहे. त्यामुळे अचानक बाजारात बाजारात सॅनिटायझर व मास्कची मोठी मागणी वाढती. मात्र, त्याचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे साठेबाजी होत काळ्या बाजारात चढ्या भावाने सॅनिटायझर विकले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

या विरोधात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 12 ने मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील परिसरात सापळा रचून तब्बल 40 लाख रुपयांचे एन 95 मास्क व सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे.

हेही वाचा-EXCLUSIVE : निजामुद्दीनमधील संपूर्ण माहिती पोलिसांना होती, मरकझमधीलउपस्थितासोबत खास बातचीत

कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एक चारचाकी वाहन सुद्धा जप्त करण्यात आलेल आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबई पोलीसांच्या वेगवेगळ्या पथकांनी मुंबई शहर व उपनगरात साठेबाजी करुन चढ्या भावाने बाजारात विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील नागपाडा, माहीम, सांताक्रुज, आगरिपाडा, बांद्रा सारख्या परिसरात पोलिसांनी कारवाई करीत आतापर्यंत करोडो रुपयांचे मास्क व सॅनिटायझर जप्त केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details