महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona : राज्यात सध्या मास्क अनिवार्य नाही; आरोग्यमंत्र्यांची माहिती - आरोग्यमंत्री तानाजी सावंत बैठक

सध्या कोरोनामुळे भारतात (Corona in India) चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या कोरोनाने चीनमध्ये पुन्हा डोके वर काढले (Mask is not mandatory) आहे. त्यामुळेच भारतातही खबरदारी (Maharashtra Corona News) घेतली जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी आज बैठक घेतली. यावेळी त्यांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जनतेले (Maharashtra Mask) केले आहे. तसेच राज्यात मास्क सक्ती (Tanaji Sawant on Mask Compulsory) नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

corona
कोरोना-आरोग्यमंत्री

By

Published : Dec 22, 2022, 9:40 PM IST

मुंबई -महाराष्ट्रात एकूण ९५% नागरिकांचे लसीकरण (Corona Vaccination in Maharashtra) झाले आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज (Mask is not mandatory) नाही. तसेच राज्यात सध्या मास्क अनिवार्य नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant on Mask Compulsory) यांनी दिली आहे. तसेच सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना कोरोनासंदर्भात आढावा बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही सावंत यावेळी म्हणाले. सध्या चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे भारतातही सध्या चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग - कोरोनासंदर्भातला आढावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज घेतला. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही 5 पॉइंट प्रोग्राम मार्गाचा अवलंब करणार आहोत. यात कोरोना चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि COVID-योग्य वर्तन सुनिश्चित करणे अशा पाच पॉइंटचा यामध्ये समावेश असणार आहे. तसेच विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details