नवी मुंबई : नवी मुंबई कोपरखैरणेत एका विवाहित महिलेने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ( Married Woman Attempt Suicide In Law Torcher ) घडली आहे. आरती विजेंद्र मल्होत्रा असे मृत महिलेचे नाव ( Suicide Attempt By Jumping From Building ) आहे. तर मुलगा अरविक हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Suicide Attempt: सासरच्या जाचाला कंटाळून मुलासह आईची 7'व्या मजल्यावरून उडी; महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर - Married Woman Attempt Suicide In Law Torcher
नवी मुंबई कोपरखैरणेत सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केला ( Married Woman Attempt Suicide In Law Torcher ) आहे. यात महिलेचा मृत्यू झाला. तर मुलगा अरविक हा गंभीर जखमी झाला आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल : सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजले आहे. या प्रकरणी आरतीच्या सासरची मंडळी सासू, सासरे, नणंद आणि पतीच्या विरोधात तिचा छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पतीला अटक केली आहे. मृतक आरतीचा विवाह कोपरखैरणे येथे राहणाऱ्या विजेंद्र मल्होत्राशी जानेवारी 2016 रोजी एका मॅट्रिमोनियल साईटवरून भेट होऊन झाला. लग्नाच्या काहीच दिवसानंतर आरतीचा सासरच्या मंडळींनी छळ करायला सुरु केले.
मुलापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न :तिला तिच्या मुलापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ( In Law Try to Keep Mother Away From Child ) केला. सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आरतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार आरतीच्या भावाने पोलिसात केली असता पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवून आरतीच्या पतीला अटक केली आहे.