महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Christmas : वसईत नाताळ सणानिमित्त बाजारपेठा सजल्या; घराघरातही नाताळाच्या पूर्व तयारीला प्रारंभ - वसईत नाताळ सणानिमित्त बाजारपेठा सजल्या

वसईत नाताळ सणानिमित्त बाजारपेठा सजल्या ( Markets decorated for Christmas ), कोरोनानंतर जवळपास दोन वर्षानंतर उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात येणार असल्याने दुकानव्यावसायिक व ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त (Express satisfaction among shopkeepers) होत आहे.

Markets decorated for Christmas
वसईत नाताळ सणानिमित्त बाजारपेठा सजल्या

By

Published : Dec 15, 2022, 12:33 PM IST

वसईत नाताळ सणानिमित्त बाजारपेठा सजल्या

वसई :मिनीगोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत सध्या ख्रिसमसची लगबग सुरू ( Sait is currently approaching Christmas ) झाली असून बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत. कोरोनानंतर जवळपास दोन वर्षानंतर उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात येणार असल्याने दुकानव्यावसायिक व ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वसई धर्मप्रांतातील वाडा-भिवंडी पासून ते वसई-पालघर, मोखाडा-विक्रमगड पर्यंतच्या 36 धर्मग्रामामधून नाताळच्या महिनाभर आधीपासूनच ख्रिस्त जन्मउत्सवाचे वेध ( Celebration of Christ Nativity ) लागून चर्चेसमध्ये महिनाभर आधीच्या चारही रविवारी नाताळाच्या आगमन कालाचा विधी सुरू होतो. घराघरातही नाताळाच्या पूर्व तयारीला प्रारंभ होऊन जातो.

काऊंट डाऊन सुरू झाल्याचे चित्र वसईत उमटले :अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या नाताळाच्या पार्श्‍वभूमीवर हा सण अध्यात्म, भक्ती व श्रद्धेसोबतच आनंद, हर्ष, उल्हास आणि एकंदर जल्लोष घेऊन येणार असल्यामुळे त्यासाठी आता काऊंट डाऊन सुरू झाल्याचे चित्र वसईत उमटले आहे. सांताक्लॉजचे लहान मोठे आणि देशी परदेशी बनावटीचे रंगीबिरंगी बाहुले, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, कागदी व प्लास्टिकच्या स्टार सोबतच लाकडी स्टार, विविध स्वरूपातील चॉकलेट बॅगा, नाताळासाठी खास तयार केलेले म्युझिकल लाईट, टेबल क्लॉथ, ग्रिटींग कार्डस, डोअर मॅट, वेलकम बॅनर, लाइटिंग-ट्री, स्नो इफेक्ट, ख्रिसमस ट्री, सिगिंग अँड डान्सिंग कॅप, रंगीबेरंगी इकोफ्रेडली कॅडल्स व स्टार्स अशा शेकडो नाताळाच्या चीजवस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या आहेत.

नाताळ गोठे बनविण्याची तयारी सुरू :वसईत घरातील प्रत्येकी एकतरी व्यक्ती नोकरी-उद्योगानिमित्त परदेशात असून, तो वर्षातून एकदा नाताळात वसईत येतोच येतो. त्यामुळे चर्च, घरे, वाड्या, गल्ल्या व तळे सजविण्याचे काम आता वेगाने सुरू असून ठिकठिकाणी नाताळ गोठे बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी ख्रिसमसच्या साहित्य खरेदीसाठी गजबजणाऱ्या बाजारपेठा कोरोनानंतर पुन्हा एकदा सजलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा नाताळ आम्हाला चांगला जाईल अशी भावना दुकानविक्रेते रोझी गोंसालवीस यांनी सांगितले.



ABOUT THE AUTHOR

...view details