मुंबई : राज्यभरात निवासी डॉक्टरांची संख्या जवळपास 5000 च्या वर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर संपावर गेल्यास ( RESIDENT DOCTORS STRIKE ) आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला असला तरी अतिदक्षता विभागात कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता डॉक्टरांकडून घेण्यात आलेली आहे. अतिदक्षता विभाग सुरू राहील यासाठी निवासी डॉक्टर काम करणार आहेत. तर तिथेच आरोग्य व्यवस्था कोलमडनार नाही. यासाठी रुग्णालयांनी प्राध्यापक डॉक्टरांना प्रचारन केले आहे. सध्या केवळ ओपीडी बंद करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. ( intensive care unit will remain open ) मात्र आंपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर याचा परिणाम पडेल असा इशारा सेंट्रल मार्ड प्रेसिडेंट अविनाश दहिफळे यांनी दिला आहे. तर तेथेच जे जे रुग्णालयात असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या समस्या सातत्याने जे जे प्रशासनाला सांगूनही त्या पूर्ण झाल्या नाहीत राहण्याचे मोठी समस्या निवासी डॉक्टरांना जे जे रुग्णालयात भेडसावत आहे. मात्र याबाबत कोणीच लक्ष घालत नसल्याचे जेजे हॉस्पिटल चे मार्ड संघटना अध्यक्ष शुभम सोनी यांनी सांगितले आहे. (STRIKE WILL START FROM Today IN MUMBAI )
निवासी डॉक्टरांच्या मागण्या :महाडच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या जवळपास दीड हजार पदांची निर्मिती करणे, निवासी डॉक्टरांचे वस्तीगृहात सुधारणा करण्यात यावी, संयोगी व सहाय्यक पदांची लवकरात लवकर भरती करणे, सर्व शासकीय आणि महानगरपालिकांच्या रुग्णालयात महागाई भत्ता सुरू करणे, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांचे वेतन समान करणे.