मुंबई :सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते समाविष्ट झाले होते. यावेळी भगवे झेंडे आणि श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. परंतु कुठल्याही जाती-पाती आणि राजकारणाचा हा मोर्चा नसताना या मोर्चाला हजेरी लावणारे भाजप नेते या मोर्चात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. लव जिहाद संदर्भात लवकरात लवकर कायदा अस्तित्वात करावा, त्याचबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदा करण्यात या अशी प्रमुख मागणी करत, सकल हिंदू समाजातर्फे मुंबईतील शिवाजी पार्क येथून हिंदू जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन केले होते.
श्रद्धा वाळकर हत्याकांड चर्चेला :मुंबई व आसपासच्या परिसरातील भागातून हजारोंच्या संख्येने हिंदू समाजाचे लोक यात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे आणि श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दमदमुन गेला होता. लव जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा लवकरात लवकर करण्यात यावा, ही प्रमुख मागणी करत हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी पार्क येथून निघालेल्या या मोर्चाचे परळ येथील कामगार मैदानात एका मोठ्या सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक भाषणे करण्यात आली. विशेष करून श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणानंतर लव जिहाद मुद्दा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आला आहे. लव जिहाद संदर्भात कडक कायदा अस्तित्वात आणावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा तयार करण्यात यावा, या मागण्या याप्रसंगी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या.