मुंबई - अभिजात बालनाट्यचा जादूगार म्हणावं अशी उत्तमोत्तम बालनाट्य देणारे ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे आज (सोमवार) कोरोनामुळे निधन झालं. त्यांच्या जाण्याने व्यावसायिक रंगभूमी एवढंच बाल रंगभूमीच देखील नुकसान झाल्याच्या भावना अभिनेता वैभव मांगले आणि अभिनेत्री गायत्री दातार यांनी ई टीव्ही भारत सोबत बोलताना व्यक्त केल्या.
बालनाट्याचा 'जादूगार' रत्नाकर मतकरी काळाच्या पडद्याआड
अभिजात बालनाट्यचा जादूगार म्हणावं अशी उत्तमोत्तम बालनाट्य देणारे ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे आज (सोमवार) कोरोनामुळे निधन झालं. त्यांच्या जाण्याने व्यवसायीक रंगभूमी एवढंच बाल रंगभूमीच नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
सुधा करमरकर यांच्यासाठी मतकरिंनी लिहिलेली 'अलबत्या गलबत्या' किंवा 'निम्मा शिम्मा राक्षस' ही नाटकं आली तेव्हा जेवढी गाजली तेवढीच आता ती पुनरुज्जीवित स्वरूपात अली तेव्हाही गाजली. आधी दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेली चिंची चेटकीण आता वैभव मांगले याने नव्या उंचीवर नेली. अलबत्या गलबत्या या नाटकाचे 500 हुन अधिक प्रयोग झाले. यात सगळं श्रेय मतकरी सर यांच्या साध्या लेखणीच असल्याचं मत अभिनेता वैभव मांगले याने व्यक्त केलं आहे. या नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मतकरी आले असता, त्यांनी पाठीवर कौतुकाने दिलेली थाप कधीही विसरता येणार नसल्याचं त्याने सांगितलं.