महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'; ज्ञानेश्वर मुळेंनी म्हटली कविता

दिल्लीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ट्विटरवर मान्यवर मराठी कविता व साहित्य वाचन करणार आहेत. याची सुरुवात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी स्वतःची कविता सादर करून केली.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By

Published : Jan 2, 2020, 9:12 AM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रसदन व महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्यावतीने आयोजित 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा'चे उद्घाटन बुधवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक आयुक्त श्यामलाल गोयल, उपसंचालक दयानंद कांबळे उपस्थित होते. १ जानेवारीपासून या पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली आहे.

दिल्लीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ट्विटरवर मान्यवर मराठी कविता व साहित्य वाचन करणार आहेत. याची सुरुवात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी स्वतःची कविता सादर करून केली.

हेही वाचा -"मराठी भाषा संवर्धनासाठी बोली अभ्यासाची आवश्यकता"

या पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र सदनात दिवाळी अंकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. डॉ. मुळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात डॉ. ज्ञानेश्वर मुळे, महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक आयुक्त श्यामलाल गोयल आणि उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details