महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महा'अर्थ' २०२०: मराठी भाषा भवनसह विविध भवन उभारणार - अर्थसंकल्प न्यूज

अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प आज सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पाकडे अनेक नव्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळे भवन बांधण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

Marathi language Bhavan will be built in mumbai
महा'अर्थ' २०२०

By

Published : Mar 6, 2020, 1:47 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प आज सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पाकडे अनेक नव्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळे भवन बांधण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

मुंबई मराठी भाषा भवन उभारणार

मराठी भाषेच्या विकास आणि प्रचारासाठी मुंबईमध्ये मराठी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

वस्तू व सेवा कर भवन

वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवन उभारणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्यासाठी ११८.१६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.

राज्य उत्पादन शुल्क भवन बांधणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री अजित पवारांनी केली.

न्यायालयीन इमारती व निवासस्थाने बांधण्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठी ९११ कोटी इतका निधी प्रस्तावित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details