मुंबई :होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या डॉक्टर तृप्ती मंगेश कुर्हे यांची कन्या तिचं नाव मंत्रा. मंत्राने कमी वयात अथक आणि मोठे दिव्य पार केलेले आहेत. आणि ते म्हणजे मुंबईच्या समुद्रात पोहण्याचा (Marathi girl Mantra Kurhe amazing record) विक्रम केला आहे. आणि हा विक्रम एका मुलीने करणे हे तर मोठे साहसी पाऊल आहे. अथक परिश्रमाने हे पाऊल मंत्राने उचलले आणि जिद्दीने रात्रीच्या वेळी (swimming in deep sea at night) समुद्र पोहून पार केला, आणि अखेर गेट वे ऑफ इंडिया गाठलं. हा भारताच्या पातळीवर अनोखा विक्रम ठरला. Balveer Mantra Kurhe
एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद -12 वर्षे आणि 9 महिने वयाच्या मंत्रा मंत्राने 20 मार्च 2022 रोजी 12 वर्षांच्या वयात 7 तास 50 मिनिटे 40 सेकंदाच्या रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेसह धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया अंतर 38 किमी अंतर यशस्वीरित्या पोहून केले. खडबडीत समुद्र आणि रात्रीचा अंधार असूनही तिने न घाबरता हे लांब अंतर पोहले. रात्रीचा अंधार असूनही तिने न घाबरता ही सफर पार केली आणि आगळावेगळा विक्रम केला. इंडिया बुक रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही मंत्राच्या नावाची नोंद (Record of Mantra Name in India Book Records) झालेली आहे.
काय आहे तिचे स्वप्न -कोपरखैरणे या ठिकाणी असलेला फादर एगल्स स्विमिंग पूल क्लब हा इथल्या विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी आहे. याच ठिकाणी मंत्रा हिने पोहण्यासाठी या स्विमिंग पूल क्लबचे आभार मानते. ती म्हणते,' मला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. आणि जसं जसं माझी आवड माझ्या आईच्या लक्षात आली तर आईने मला पाठीवर थाप दिली. मग मी या फादर एंगल्स स्विमिंग क्लबला यायला लागली. इथे सराव केला. दिवसाचे पाच सहा तास सुद्धा मी सराव करायचे. त्यानंतर खुल्या समुद्रात देखील मी सराव केला. आणि धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास मी यशस्वी पणे पार केला. या समुद्रात जल फिश असतात त्याची भीती वाटली नाही का? या ई टिव्हीच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने न डगमगता नाही असे सांगितले. थोडी सवय होती. जल फिश त्रास देतात; असं माहिती होतं. त्याची तयारी मी केलेली होती आणि जल फिशचा त्रास होऊ नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केला होता आणि वेळेत गेटवे पर्यंत पोहोचली. त्यामुळे खूपच आनंद वाटला. आता इंग्लिश समुद्रात पोहण्याचे स्वप्न आहे, असे हिमतीने तिने ईटीव्ही सोबत संवाद साधताना सांगितले.'