महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदार जनजागृती अभियान : मतदानाचा हक्क बजावा, सेलिब्रिटींचे आवाहन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी शासन स्तरावर तथा विविध सामाजिक संस्थांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मतदार जनजागृती अभियान

By

Published : Oct 16, 2019, 11:06 AM IST

मुंबई- जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि जिल्हा स्वीप कार्यक्रम अंतर्गत मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यमंदिरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी अभिनय क्षेत्रातील मान्यवरांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे केले आवाहन केले.

सुभाष दळवी, विशेष कार्यकारी अधिकारी, स्वीप

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा, याकसाठी नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी शासन स्तरावर तथा विविध सामाजिक संस्थांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातून जास्तीत जास्त मतदार मतदान करण्यासाठी जागृत झाले पाहिजे, हा जनजागृतीचा उद्देश आहे.

हेही वाचा -विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

यावेळी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी कलाकारांकडून आवाहन करण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन, मतदानाची प्रक्रिया किती सुलभ व सोपी आहे, याचे मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी असलेल्या सुविधा व योजनाही यावेळी सांगण्यात आल्या. या कार्यक्रमाला सुलेखा तळवलकर, संदीप फाटक यांनी हजेरी लावून नागरिकांना 21 ऑक्टोबरला मतदान करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा -मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details