मुंबई- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवारी विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या प्रांगणात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विलेपार्ले पोलीस स्थानकाच्या पुढाकाराने मराठी गीताची मैफिल रंगली.
विलेपार्लेत शब्द-सुरांच्या साथीने झाली मराठी भाषेची कौतुके - लता गुठे
मराठी संगीत रजनीमध्ये ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणानी जोगळेकर, अजित कडकडे, श्रीधर फडके, आणि वैशाली सामंत यांच्या गाण्यांनी ही संध्याकाळ संस्मरणीय ठरली. याशिवाय अभिनेत्री ईला भाटे, अभिनेता सुमित राघवन, अभिनेते प्रदीप वेलणकर, दिग्दर्शक सतीश राजवाडे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मराठी संगीत रजनीमध्ये ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणानी जोगळेकर, अजित कडकडे, श्रीधर फडके, आणि वैशाली सामंत यांच्या गाण्यांनी ही संध्याकाळ संस्मरणीय ठरली. याशिवाय अभिनेत्री ईला भाटे, अभिनेता सुमित राघवन, अभिनेते प्रदीप वेलणकर, दिग्दर्शक सतीश राजवाडे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याशिवाय या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक माधवी कुंठे, लता गुठे आणि गुरुनाथ तेंडुलकर या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.