मुंबई - मराठा आरक्षण महाराष्ट्रात लागू झाले. परंतु मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळताना दिसत नाही. मराठा आरक्षण २०१८, अधिनियम ६२ क्रमांक १८ नुसार मराठा समाजाच्या उमेदवारांना शासकीय नोकरीत नियुक्ती मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज महाराष्ट्र पुरस्कृत धरणे आंदोलन आझाद मैदान येथे सुरू आहे.
न्यायासाठी मराठा तरुण आझाद मैदानात
जोपर्यंत या उमेदवारांना नियुक्ती मिळणार नाही, तोपर्यत हे आंदोलन सुरू राहील असे मराठा तरुण आंदोलकांनी सांगितले.
न्यायासाठी मराठा तरुण आझाद मैदानात
आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. रविवार असून देखील हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत या उमेदवारांना नियुक्ती मिळणार नाही, तोपर्यत हे आंदोलन सुरू राहील, असे आंदोलकांनी सांगितले आहे. या आंदोलकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.