मुंबई- मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे निघाले होते. यानंतर राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मराठा आरक्षण लागू केले. मात्र, नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे मराठा समाजातील मेडिकल प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एसईबीसी' च्या माध्यमातून प्रवेश नाकारण्यात येत आहे. सुरुवातीला राज्य सरकारने 'एसईबीसी'च्या माध्यमातून सुरू केलेले मेडिकल प्रवेश अचानक रद्द ठरल्याने राज्यातील हजारो मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे.
मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी'च्या अंतर्गत मेडिकल प्रवेश देण्याची मागणी - SEBC
नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे मराठा समाजातील मेडिकल प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'एसईबीसी' च्या माध्यमातून प्रवेश नाकारण्यात येत आहे. सुरुवातीला राज्य सरकारने 'एसईबीसी'च्या माध्यमातून सुरू केलेले मेडिकल प्रवेश अचानक रद्द ठरल्याने राज्यातील हजारो मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे.
मराठा विद्यार्थ्यांना 'एसईबीसी'च्या अंतर्गत मेडिकल प्रवेश देण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा म्हणून मराठा समाजातील विद्यार्थ्यांची आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे मराठा नेते आबा पाटील व मेडिकल प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी संवाद साधला आहे.
Last Updated : May 6, 2019, 12:21 PM IST