मुंबईMaratha Reservation Protest :आज तब्बल 17 दिवसांनंतर महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा मनोज जरांगे यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री उदय सामंत, संदिपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील हे आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यांनी सर्वांनी जरांगेंशी संवाद साधला. यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांच्या समर्थकांमध्ये उपोषण संपवण्याची घोषणा केलीय. (Manoj Jarange quit hunger strike)
राज्य सरकारला ३० दिवसांचा अल्टिमेटम : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 30 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. सरकारनं तसं न केल्यास पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. याशिवाय त्यांनी मराठा समाजाला पुढील 30 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची मालिका सुरू करण्यास सांगितलं होतं. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या एका आश्वासनावरच उपोषण सोडलं. केवळ एका आश्वासनावर त्यांनी माघार कशी घेतलीय, असा प्रश्न उपस्थित होतोय. (Manoj Jarange hunger strike)
मनोज जरांगे यांच्या मागण्या :यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारसमोर अनेक मागण्या मांडल्या आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. यासोबतच जीआरमधील वंशावळीचा उल्लेखही काढून टाकण्यात यावा. याशिवाय निदर्शनादरम्यान लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं. त्याचबरोबर ज्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते तत्काळ मागे घेण्यात यावे अशा मागण्या त्यांनी केल्यात. (Maratha Reservation Protest 17th Day)
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ :29 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं होतं. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्यानंतर सरकारमधील आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी उपोषणस्थळी भेट दिली होती. अगदी शरद पवारांच्यापासून अनेक मंत्री आणि त्या भागातील आमदारांच्या पर्यंत तिथे नेते गेले होते. खा. उदयनराजे भोसले, खा. संभाजीराजे यांनीही तिथे भेट दिली. त्यामुळं संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला होता. सगळीकडे दंगली, उपोषण मराठा समाजाने सुरू केली होती. आता उपोषण तरी संपलंय. पुढे आरक्षणाचं काय होतं, ते लवकरच कळेल.
हेही वाचा :
- Maratha Reservation : 500 ट्रॅक्टरसह आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी रवाना ; पहा व्हिडिओ
- Jalna Maratha Protest : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर मागे
- Boycott Elections: मराठा आरक्षण मिळेपर्यंत 'या' गावानं घातलाय निवडणुकीवर बहिष्कार, पाहा गावकरी काय म्हणतात...