मराठा आरक्षण आणि राज्याच्या विकासावर शिंदे गटाची प्रतिक्रिया मुंबईMaratha Reservation Issue:उद्धव ठाकरे असो किंवा आतापर्यंत काँग्रेसचे जे-जे मराठा मुख्यमंत्री आणि मंत्री झाले त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. म्हणून आज मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे, असं किरण पावसकर म्हणाले. (Shinde Faction on Maratha reservation) जरांगे-पाटील आज आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. आम्ही आजही ठामपणे सांगतो की, मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेंच आरक्षण देऊ शकतील, असा विश्वास पावसकर यांनी व्यक्त केला.(Uddhav Thackeray)
'त्यांनी' नाईट लाईफमधून बाहेर यावे:उबाठा गटाचे आमदारआदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पब, डिस्को तसेच नाईट लाईफमधून बाहेर पडावे आणि मग बोलावे. आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असताना काम केले नाही आणि आज आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला न्याय आमचं सरकार देत आहे; पण विरोधक गुजरातला प्रकल्प जातात असं पसरवत आहेत. AIR India ची इमारत मुख्यालय दिल्लीला कोणी नेलं ते सुद्धा संसदरत्न सुप्रिया सुळेंनी सांगावं. शिंदे सरकार आल्यानंतर रोजगार निर्माण झाले, मी नाव घेणार नाही. पण राज्यातील महत्त्वाच्या दिवसात परदेशात कोण कोण फिरायला जात..? हे यांनी सांगावं असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले.
बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरेंचं युनियन:राज्यातील उद्योग-धंदे बाहेर गेल्याचा आरोप विरोधक करताहेत; पण काहीही झालं तरी सध्याचं सरकार कसं वाईट आहे हेच विरोधक म्हणतात. राज्यातले पप्पू (आदित्य ठाकरे) लोकांमध्ये असं पसरवतात. जेव्हा-जेव्हा विरोधक काहीपण बोलतात तेव्हा राज्याचा विकास सुरू आहे असं समजावं. ज्या ठिकाणी कंपन्या बंद झाल्या आहेत किंवा जिथं रोजगार बंद झाले तिथं उद्धव ठाकरे यांचं युनियन होतं. अशी टीका किरण पावसकर यांनी ठाकरे गटावर केली.
उद्धव ठाकरे मागच्या दाराने पळून गेले:पुढे बोलताना, किरण पावसकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नियमानुसार आमदार अपात्र यावर सुनावणी सुरू आहे. तुमच्या ४० आमदारांनी स्वतः सांगितलं की, आम्हाला तुमचं नेतृत्व मान्य नाही. उद्धव ठाकरे हे विधानसभेत अपात्र ठरतील. पण ४० आमदारांनी जेव्हा त्यांची सत्यता सभागृहात मांडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे उत्तर द्यायला नव्हतं. म्हणून उद्धव ठाकरे मागच्या दाराने पळून गेले, असा जोरदार प्रहार पावसकर यांनी केला.
हेही वाचा:
- Maratha Reservation : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवीगाळ केलेला मराठा तरुण 'ईटीव्ही भारत'वर; म्हणाला...
- Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ
- Maratha Protest : उपोषणस्थळास वेळेवर भेट न दिल्याने मराठा आंदोलक संतप्त; तहसीलदारांची गाडी फोडली