जालना Maratha Reservation issue: शिंदे फडणवीस सरकारच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलीय. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
Live Update
उद्या कोल्हापुरात बंद - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे, राज्यातील अनेक जिल्हे बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला, बीड, सातारा पाठोपाठ आता मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात या हल्ल्याचा निषेध करत जवाब दो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी राज्य सरकार विरोधात आणि लाठी हल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक म्हणाले, राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षा सुरू आहेत. तलाठी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर बंदचा कोणताही फटका बसणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
इतर समाजाचे समाजाचे आरक्षण कमी करू नये-मराठा समाजाला आरक्षण मिळावे हे महत्वाचे असले तरी त्यासाठी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्याची भूमिका घेणे योग्य नाही. अशा गोष्टींना बळ देऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करू नका. ओबीसीतील व्हीजे-एनटी व इतर समाजाचे समाजाचे आरक्षण कमी करण्याचा विचार करू नये, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलयं. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकविण्यात महाविकास आघाडी सरकार व ओबीसी मंत्री म्हणून विजय वेडेट्टीवार नापास झाले. आता ते विशेष अधिवेशन घेण्याच्या बाता करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात विशेष अधिवेशन घेऊन तोडगा का काढला नाही? असाही प्रतिप्रश्न बावनकुळे यांनी केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपाचा पुरावा त्यांच्याकडे असेल तर तो २४ तासांत आत द्यावा. केवळ राजकारणासाठी काहीही विधाने करू नये.
कोपरगावात कडकडीत बंद-अहमदनगर जिल्ह्यात आज चौथ्या दिवशीही जालना येथील लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध होतोय. आज जिल्ह्यातील कोपरगाव आणि राहुरी शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शांततेच्या मार्गाने तालूका बंद ठेवून जालन्यातील घटनेचा निषेध करण्यात आला. कोपरगाव सकाळपासून सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवले असून सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी 10 वाजता कोपरगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेण्यात आली आहे. यावेळी मराठा समाजाचा कार्यकर्त्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. कोपरगाव तालुक्यातील सर्वच शाळा तसेच बस सेवादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.
- अंगावरील कपडे जाळून दौंडमध्ये आंदोलन-जालना येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलकांवर झालेल्या लाठचार्ज विरोधात राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव मधील मराठा समाजातील तरुणांनी अंगावरील कपडे जाळून मराठा आरक्षण मिळावे यासाठी लक्षवेधी आंदोलन केले.
पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन-पुण्यातील कोथरूड येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यावतीने जालना येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे म्हणाले, शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत आंदोलन करत असताना मुंबईच्या आदेशाने आंदोलनकर्त्या लोकांवर लाठीचार्ज, गोळीबार आणि अमानुष मारहाण करण्यात आली. सरकार मराठा समाजाचा अंत पाहत आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, मी मराठा समाजाला आवाहन करतो की त्यांनी आत्ता या सरकारकडून आरक्षण घेऊ नये. यांची भिक समाजाला नको आहे.पुढे जी सरकार येईल त्यांच्याकडूनच आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असेदेखील यावेळी शिंदे म्हणाले.
अंगावरील कपडे जाळून दौंडमध्ये आंदोलन-जालना जिल्ह्यातील उपोषणकर्त्यांच्यावरती झालेला लाठीचार्ज व गोळीबारनंतर मराठा समाज राज्यभर आक्रमक झाला आहेत. राज्यभर बंद, रास्ता रोको, निषेध मोर्चे निघत आहेत. कानगाव मध्ये काल गाव बंद ठेवून निषेध सभा घेऊन आंदोलकावरील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. आज पुन्हा कानगावमध्ये मराठा समाजाने अंगावरील कपडे जाळून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. शांतता प्रिय आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या मागणीकडे केंद्र व राज्य सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- माझ चुकत होते. तेव्हा विकेटकीपर काय करत होते, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
- तिघांनीही राजीनामा द्यावा.
- अजित पवार यांना समजूतदार होतो.
- हे नालायक आहेत. सरकार चालविण्यासाठी नालायक आहेत.
- हिंदुत्ववादी म्हणणारे सरकार वारकऱ्यांवर लाठीमार करते.
- सरकारकडून फक्त पक्षाची फोडाफोड सुरू आहे.
- शाळकरी मुलांनाही लाठीमार करण्यात आले.
- जालना येथील लाठीमार म्हणजे आंदोलन केले तर डोके फोडून टाकू, असा अर्थ झालाय.
- माफी मागितली याचा अर्थ काय, अंगलट येणार असल्यान माफी मागितली आहे. बारसू येथील लाठीमारासंदर्भात मागितली आहे. कुणाचे नाक फोडले तर कुणाच्या डोक्यात छर्रे गेले आहेत.
- आंदोलकांची डोकी फोडण्याचे सरकारने ठरविले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- मनोज जरांगेच्या मागणीवर सरकार गांभीर्याने काम करत आहे. आंदोलनाला गालबोट लावू देऊ नका. यापूर्वी लाखांचे ५८ मोर्चे निघाले. पण, कुठेही गालबोट लागले नाही. मराठा समाज शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे. मनोज जरांगे यांच्याशी मी स्व:त चर्चा केली आहे. जालन्यातील प्रकार दुर्दैवी आहे.
- संभाजी राजे सुद्धा त्या ठिकाणी गेले. त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला. जरांगे यांच्या तब्येतीची सरकारला काळजी आहे.
- मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शासन गंभीर आहे
- 3700 विद्यार्थी निवडूनही त्यांची नेमणूक करण्यात आली नव्हती. त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण केली आहेत.
- साडेपाच हजार कोटी रुपयांचे कर्ज लाभार्थ्यांना दिले.
- २ हजार कोटी रुपये शुल्क सरकारच्यावतीने भरले जात आहे.
- राज्य सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे आहे. आम्हाला कुणाची फसवणूक करायची नाही.
- राजकीय पोळी भाजणाऱ्यापासून मराठा समाजाने दूर राहावे.
- कुणबी समाजाच्या दाखल्याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव काम करत आहेत. समितीने एक महिना पूर्ण अहवाल शासनाला देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- चुकीचे गुन्हे दाखल केले असतील तर मागे घेणार आहेत.
- लाठीचार्ज प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांना जिल्हाबाहेर घालविलय. उपविभागीय अधिकाऱ्यांचे निलंबन केलेय. चौकशीनंतर लाठीचार्ज प्रकरणाची माहिती समोर येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- तब्येत बरी नसताना गैरसमज पसरविण्यात आले. सध्या, राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे.
- कायद्याच्या चौकटीत बसणारे निर्णय झाले पाहिजेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा टिकला पाहिजे.
- देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतल्यानं मराठा आरक्षण टिकलं होते.
- कुठेही कायद्यात अडचण येऊ नये हा प्रयत्न करावा लागतो
- सर्वोच्च न्यायालयाने का आरक्षण नाकारले याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे.
- मराठा समाजाला आवाहन आहे, जाळपोळमध्ये राज्याचे नुकसान आहे. यापूर्वीचे आंदोलन अतिशय अभुतपूर्व आणि शांततामय होते. त्याची देशभरात नोंद घेण्यात आली होती.
- मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारची सातत्याने चर्चा सुरू आहेत.
- जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. लाठीचार्जचे आदेश वरून आले असे म्हटले जाते. ते सिद्ध करून दाखवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना दिले.
- तिघांपैकी कुणी लाठीचार्जचे कुणी आदेश दिले? याची चौकशी करावी. यात कुणीही आढळले तर राजकारणातून बाजूला होईन. जर आम्ही आदेश दिले नव्हते, हे सिद्ध झाले तर आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून दूर व्हावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे,
- मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी तोडगा काढला नाही. त्यांनी मुख्यमंत्री असताना का वटहुकूम काढला नाही? आम्ही कधीही बळाचा वापर करत नाही. आरक्षणाचा कायदा २०१८ साली तयार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी जालन्यात लगेच वटहुकूम काढण्याचा मागणी केली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने 70 हजार लाभार्थी आहे. त्यांना दिलेल्या कर्जाचे व्याज राज्य सरकार भरते. ओबीसीच्या सर्व सवलती मराठ्यांना दिल्या आहेत. मराठा समाजाला ५ हजार कोटींचे कर्जवाटप करण्यात आलय. युपीएससी व एमपीसीसाठीसाठी योजना सुरू केली आहे.
- महाराष्ट्र शासनाच्यावतीने वकिलांनी नीट बाजू न मांडल्याने मराठा समाजाचे आरक्षण गेले. जे नेते मराठा समाजाबाबत पुळका दाखवत आहेत. त्यांनी आरक्षण घालवले.
- उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाजासाठी अधिसंख्यपदाच्या मागणीकडे लक्ष दिले नाही.
- एकनाथ शिंदे यांच्या सरकारने अधिसंख्य पदे तयार करून त्यांना सामावून घेतले.
- मराठा आरक्षण टिकणारं असावं. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- हल्ल्यातील जखमींची क्षमा मागत आहोत. जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. लाठीचार्जच्या आदेशाचेअधिकार पोलीस अधीक्षकांना आहेत. जालन्यातील लाठीहल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. बळाच्या वापरण्याचे काहीच कारण नव्हते. विरोधकांनी राजकारण केले, असा आरोप गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्यापासून पाणी सोडणार असल्याचा इशारा- मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलक मनोज जरांगे यांचे सलग सातव्या दिवशी आंदोलन सुरू आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, याकरिता राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आमदार अर्जुन खोतकर हे आंदोलकांची समजूत घालत आहेत. मात्र, जीआर निघाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक मनोज जारंगे यांनी घेतलीय.सरकारला २ दिवसांचा वेळ दिला होता. त्यामधील एक दिवस संपला आहे. सरकारनं गंभीर गुन्हे मागे घ्यावेत. सरकारनं तेच पाढे वाचू नये. सरकारच्या लोकांनी अध्यादेश घेऊन यावं, अन्यथा उद्यापासून पाणी सोडणार असल्याचा इशारा आंदोलक मनोज जारंगे यांनी दिलाय.
दिवसभरात काय घडलयं?
- जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरसह औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला उदंड प्रतिसाद म्हणून शिवसेनेच्या ठाकरे गटानं जोरदार निदर्शन करत, टरबूज फोडून आंदोलन केलं.
हेही वाचा-
- Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर, संभाजीनगरमध्ये युवकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
- Raj Thackeray Met Maratha Protestors : लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेऊ देऊ नका; राज ठाकरे आक्रमक