महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणाबाबत सरकार पूर्ण शक्तीनिशी काम करत आहे, जरांगे पाटलांना समजावले जाईल - देवेंद्र फडणवीस - मराठा आरक्षणाचा मुद्दा

Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा नेते जरांगे पाटील २० जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (Devendra Fadnavis On Maratha Reservation) त्यांच्या या भूमिकेवर बोलताना उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, मराठा आरक्षणाबाबत सरकार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. याबाबत जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

Marath Reservation Issue
देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 5:05 PM IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबईMaratha Reservation Issue:मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम पूर्ण झाला असून सरकारने अद्याप त्यावर निर्णय न घेतल्या कारणाने मराठा नेते जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) फार आक्रमक झाले आहेत. काल बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी यापुढील आंदोलन हे मुंबईत होणार असून मुंबईतील आझाद मैदानात २० जानेवारीपासून ते आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. (Devendra Fadnavis) या कारणाने कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न हा मुंबई तसेच राज्यात उद्‌भवू शकतो. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भेटत असलेले समर्थन बघता पूर्ण मुंबईत चक्काजाम होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष:जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सांगितले आहे की, मराठा आरक्षणाच्या बाबत सरकार अतिशय सकारात्मक काम करत आहे. मुख्यमंत्री स्वतः जातीने या सर्व गोष्टींवर लक्ष घालून आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केले आहे. त्याचबरोबर शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला असून तिसरा अहवाल सुद्धा लवकरच अपेक्षित आहे. ज्यामध्ये निजामकालीन नोंदणी असणार आहेत. याबाबत हैदराबाद वरून नोंदी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारची सकारात्मक बघता जरांगे पाटील यांनी असा निर्णय घेऊ नये अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


लवकरच यातून मार्ग निघेल:देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आहेत की, ज्या पद्धतीने राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत पाऊलं उचलत आहे ते बघता लवकरच हा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा धक्का न लावता सरकारचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. ठरवल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत सरकारने विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. या अधिवेशनामध्ये यावर सविस्तर चर्चा होऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा संपवला जाईल असेही ते म्हणाले. शेवटी सकारात्मक चर्चेतून मार्ग निघतो आणि मला अपेक्षा आहे की लवकरच यातून मार्ग निघेल व मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


स्वार्थासाठी एकत्र:एकीकडे अदानी यांच्या प्रकल्पाला उद्धव ठाकरे गटाकडून तसेच विरोधकाकडून विरोध होत असताना शरद पवार यांनी अदानी यांची प्रशंसा केली आहे. या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अदानी यांच्या नावाने ज्या प्रकारचे राजकारण हे करत आहेत हा यांचा ढोंगीपणा आहे. हे एका विषयाला घेऊन विरोध करत आहेत तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे प्रमुख असलेले बिहारचे मुख्यमंत्री यांनी बिहारमध्ये अदानी यांचं स्वागत करत ८ हजार करोडचा प्रकल्प तिथे उभारणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये यांच्यामध्येच कशा पद्धतीची आघाडी आहे हे दिसून येते. फक्त मोदींमुळे यांची भ्रष्टाचाराची दुकानं बंद झाली आहेत. हे सर्व एकत्र आले आहेत हा यांचा स्वार्थ असून स्वार्थासाठी एकत्र आलेले स्वार्थासाठीच विघटित होतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा:

  1. दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; अजान पठण करताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
  2. विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी; 'या' वाहनांना महामार्गावर प्रवेश नाही
  3. मागील 25 वर्षात तुम्ही फक्त मुंबईला लुटलं; शिवसेना नेत्यांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details