महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, मराठा बांधवांना मिळणार का दिलासा? - मराठा आरक्षण

Maratha Reservation Hearing : मराठा आरक्षणासंदर्भात उद्या (6 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं 13 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी क्युरेटीव्ह याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 6 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे.

Maratha reservation curative petition hearing in supreme court on 6 december 2023
मराठा आरक्षणासंदर्भात 6 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:19 AM IST

मुंबई Maratha Reservation Hearing :राज्य सरकारनं 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटीव्ह याचिका दाखल केली होती. त्यानंतर यासंदर्भातील ही पहिलीच सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, या याचिकेवर मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असून या सुनावणीवर आता मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

चार सदस्यीय खंडपीठासमोर होणार सुनावणी :सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठानं मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द केलं होतं. त्यानंतर या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा या मागणीसह राज्य सरकारकडून 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान, चार सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दुपारी दीड वाजेच्या सुमारास या सुनावणीला सुरुवात होणार आहे. तसंच या सुनावणीमध्ये अ‍ॅड. जयश्री पाटील विरोधक आहेत.

आरक्षण रद्द होण्यामागचं कारण काय? : 2018 मध्ये राज्य शासनानं मराठा समाजास एसईबीसी कायदा करुन आरक्षण दिलं होतं. मराठा समाज सामजिक अन् आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा दावा करत हे आरक्षण देण्यात आलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयात हे सिद्ध करण्यास राज्य सरकारला अपयश आलं. त्यामुळं पाच सदस्यीय खंडपीठानं मराठा समाजाची आरक्षणाची मागणी फेटाळून लावली. यासंदर्भातील निर्णय देताना खंडपीठानं 3:2 मतानुसार राज्यघटनेच्या 102 व्या दुरुस्तीनुसार राज्य सरकारला कोणत्याही एका समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करण्याचे अधिकार नसल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. तसंच मराठा समाजाला आरक्षण देता येणं शक्य नसल्याचं यावेळी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं होतं. त्यामुळं आता उद्याच्या सुनावणी काय होणार हे पाहण महत्वाचं असणार आहे.

हेही वाचा -

  1. "मला अटक झाली की कळेल मराठा समाज काय आहे", मनोज जरांगेंचा सरकारला गर्भित इशारा
  2. मराठा आरक्षण आंदोलन; अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मुख्य आरोपीला कोठडी, पोलिसांनी एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस केले जप्त
  3. मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार; जाणून घ्या कारण

ABOUT THE AUTHOR

...view details