मुंबईMaratha Protest Jalna:मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या 16 दिवसापासून मनोज जरांगे उपोषणासाठी बसले आहे. काही दिवसापूर्वी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झालाय. सरकार विरोधात मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष करत निदर्शनं केली गेली.
Maratha Protest Jalna: अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार मनोज जरांगेची भेट! शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची फसवणूक- अतुल लोंढेंचा आरोप - मराठा आंदोलन
Maratha Protest Jalna : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार आहे, अशी माहिती समोर येतेय. तर आरक्षण प्रश्नावरून शिंदे सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय.
Published : Sep 13, 2023, 4:47 PM IST
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित :मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं, यासाठी सरकारकडून त्यांना विनंती करण्यात आलीय. सरकारनं आरक्षणासंदर्भात विचार करण्यास एक महिन्याची वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मनोज जरांगे हे वेळ देणार आहे. उपोषण सोडत्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित (CM DCM Will Meet Manoj Jarange Patil) राहावं, अशा प्रकारची अपेक्षा जरांगेंनी बोलून दाखवली होती. त्या अनुषंगानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन तीन वाजेच्या सुमारास जालन्याकडे रवाना होणार आहे. 5 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडतील, अशी माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis) राज्याबाहेर असल्यानं जालना येथे जाणार नसल्याची माहित मिळत आहे.
शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची फसवणूक :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय सह्याद्रीत एक बैठक बोलावली होती. बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत की, आपण बोलून मोकळे होवून जावू. त्यामुळं यामागं काय दडलं आहे? हे लक्षात येतंय. त्यामुळं आरक्षणप्रश्नी शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची घोर फसवणूक होतेय, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय.
-
व्हिडिओमुळे विरोधक आक्रमक : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आरक्षणाच्या मुद्द्या संदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीनंतरच्या सह्याद्री पत्रकार परिषदेपूर्वी व्हायरल झालेल्या संभाषणाच्या व्हिडिओमुळे विरोधक आक्रमक झालेत. त्यातच मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटीत काय निर्णय होतो, याकडं सर्वांचं लक्ष (Manoj Jarange Patil hunger striker) लागलंय.
हेही वाचा :
- Maratha Reservation : 500 ट्रॅक्टरसह आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी रवाना ; पहा व्हिडिओ
- Maratha Protest: आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक; छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको, तर १७ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास...
- Maratha Reservation : संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; उपोषण मागं घेण्याची विनंती