महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राऊत यांनी महाराजांच्या वंशजांवर केलेले वक्तव्य मागे घ्यावे; अन्यथा... - maratha kranti morcha press conference

संजय राऊत हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून काही ना काही लोकांच्या भावना दुखावत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्यामुळे राज्यभरातील महाराजांचे अनुयायी असलेल्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

maratha kranti morcha, mumbai
मराठी क्रांती मोर्चा, मुंबई

By

Published : Jan 16, 2020, 4:23 PM IST

Updated : Jan 16, 2020, 11:26 PM IST

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बुधवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात प्रतिक्रिया उमटत होत्या. इंदिरा गांधी यांच्या बाबतीत देखील केलेले वक्तव्य काँग्रेसला न पटणारे होते. त्यामुळे राजकीय हितसंबंध जपत राऊत यांनी इंदिरा गांधींबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या घराण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची देखील माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी इशाराही त्यांनी दिला आहे.

राऊत यांनी महाराजांच्या वंशजांवर केलेले वक्तव्य मागे घ्यावे; अन्यथा...

संजय राऊत हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून काही ना काही लोकांच्या भावना दुखावत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्यामुळे राज्यभरातील महाराजांचे अनुयायी असलेल्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. राजकीय हितसंबंध जपत संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यावर केलेले वक्तव्य देखील त्यांनी मागे घ्यावे. अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. तसेच शिवसेना भवनावर आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कार्यालयावरही आंदोलन करण्यात येईल, असे मराठा क्रांती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा - संजय राऊतांचे I AM सॉरी ! इंदिरा गांधींबद्दलचे विधान घेतले मागे

Last Updated : Jan 16, 2020, 11:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details