महाराष्ट्र

maharashtra

..अन्यथा एमपीएससीचे कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

By

Published : Oct 5, 2020, 9:24 PM IST

आरक्षणाचा निर्णय घेण्यापूर्वीच जर परीक्षा घेतल्या, तर मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससी तसेच अन्य शासकीय परीक्षा रद्द कराव्यात अन्यथा हिंसक आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.

maratha-kranti-demanded-to-cancle-mpsc-exam-on-the-behalf-of-maratha-reservation
...अन्यथा आयोगाचे कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई - मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससी तसेच अन्य शासकीय परीक्षा रद्द कराव्यात अन्यथा हिंसक आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुंबई कार्यालयाबाहेर गोंधळ घालत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुंबई कार्यालयाबाहेर गोंधळ घालत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.

आरक्षणाचा निर्णय घेण्यापूर्वीच जर परीक्षा घेतल्या, तर मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री आणि मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. यावेळी 5 ऑक्टोंबरपर्यंत निर्णय घ्यावा, अशी विनंती मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयावर मोर्चा काढला आहे. जर मराठा आरक्षण लागू होईपर्यंत परीक्षा रद्द झाल्या नाहीत, तर आम्ही आयोगाचे कार्यालय फोडल्याशिवाय आणि मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details