मुंबई-वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा यासाठी शासनाने अध्यादेश काढला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबही झाले. परंतु, त्याला न्यायालयात आव्हान मिळू शकते आणि हा अध्यादेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयात हा अध्यादेश सरकारने टिकवावा त्यानंतरच आंदोलन मागे घेऊ, असा निश्चय विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्टर रोड बांद्रा येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
सरकारने काढला अध्यादेश; वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र सुरूच
आता निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने राज्य सरकार या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अध्यादेश काढला आहे.मात्र, या अध्याधेशाला न्यायालयात आव्हान मिळू शकते. त्यामुळे न्यायालयात हा अध्यादेश सरकारने टिकवावा त्यानंतरच आंदोलन मागे घेऊ, असा निश्चय विद्यार्थ्यांनी केला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांचे आज तेरा दिवस झाले तरी आंदोलन सुरूच आहे. आता निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने राज्य सरकारने या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अध्यादेश काढला आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून राज्य सरकार राज्याच्या अधिकार वापरण्याचा प्रयत्न करत आहे. काल विद्यार्थ्यांना आझाद मैदान येथे आंदोलनाला बसता येणार नाही, असे पोलिसांनी म्हटले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी दुसरीकडे आंदोलनासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यावर आज विद्यार्थ्यांनी मुंबईतील बांद्रा कार्टर रोड येथे एकत्र येत 'डिफेन्ड मर्डर ऑफ मेरिट' अशा घोषणा देत आंदोलन केले नंतर ते पुन्हा आझाद मैदान येऊन बसले. प्रवेश निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, अध्यादेश काढा तो न्यायालयात टिकवा, अशी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली आहे.