मुंबई - मराठा आरक्षण २०१८ अधिनियमानुसार मराठा समाजाच्या उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये नियुक्त्या मिळाव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून मराठा समाज करत आहे. आता याच मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु आहे. आज (शुक्रवार) या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. जोपर्यंत या उमेदवारांना नियुक्ती मिळणार नाही, तोपर्यत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे.
2014 च्या 9 जुलै 2014 पासून 14 नोव्हेंबर 2014 या कालावधीमधील नोकऱ्यांच्या जाहिराती, नियुक्त्या, प्रवेश, हे कलम 18 प्रमाणे संरक्षित आहेत. त्यामुळे कलम 18 लागू करून आम्हाला नियुक्त्या देण्यात याव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.