मुंबई- मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे खड्डे पडलेल्या तक्रारीचे प्रमाण कमी झाले आहे. पालिकेकडे ज्या काही तक्रारी आल्या त्यावर कार्यवाही करत बहुसंख्य खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईत पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एसआरए, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे आदी प्राधिकरणाच्या अखत्यारीत रस्ते आहेत. पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यावर त्यामधून वाहनांना मार्ग काढत प्रवास करावा लागतो. विशेष करून दुचाकींना मार्ग काढताना अपघात होतात. दुचाकी घसरून अपघाताच्या अनेक घटना घटतात त्यात काही जण जखमी होतात तर एखाद्याचा जीवही जातो. पावसाळ्यात पालिकेकडे दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या तक्रारी यंदाच्या वर्षी कमी झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी 433 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 380 पेक्षा अधिक तक्रारींची दखल घेत पालिकेने खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी इतर प्रशासनाकडूनही त्यांच्या रस्त्यावर असलेले खड्डे बजवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबईत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजबल्याचा दावा सर्वच यंत्रणा करत असल्या तरी आजही रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊन असल्याने आतापर्यंत रस्त्यावरून वाहने कमी प्रमाणात जात होती. आता अनलॉक सुरू झाले असल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एखाद्या दुचाकीस्वाराचा अपघात किंवा अपघातात मृत्यू होण्याची भीती असल्याने खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी केली जात आहे.
खड्डे बुजवण्यासाठी तरतूद