मुंबई -Look Back 2022 : राज्यात सरत्या वर्षाने अपघाताची मालिकाच दिली आहे. यात रस्ते अपघात, आगीच्या ( Fire In Maharashtra 2022 ) घटनांनी राज्याला चांगलाच हादरा बसला आहे. महाराष्ट्रात 2022 या वर्षात अनेक नागरिकांनी विविध अपघातात आपला जीव ( People Died In Accident At Maharashtra 2022 ) गमावला आहे. त्यातील नाशिक बस ( Bus Caught Fire in Nashik ) अपघातात 12 प्रवाशांचा बळी गेल्यामुळे खळबळ उडाली होती. तर पुण्याची बस नर्मदा नदीत ( Pune Bus Fell In To Narmada River 2022 ) कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनेही नागरिकांना धक्का बसला होता. त्यापाठोपाठ मुंबईत आगीच्या ( Kamala Building Fire In Mumbai 2022 ) घटनेने 6 जणांचा बळी घेतला होता. तर वर्धा येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन आमदार पुत्रासह 7 जणांचा बळी गेल्याने राज्यात खळबळ उडाली होती.
नाशिक बस दुर्घटनेत 11 ठार, 20 प्रवासी जखमीयवतमाळवरुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसने 7 स्पटेंबरच्या दुपारी ट्रकला धडक दिली. या धडकेनंतर बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू ( Bus Caught Fire in Nashik ) झाला, तर 20 प्रवाशी जखमी झाले. 30 आसन क्षमता असताना बसमध्ये एकूण 48 जण प्रवास करत होत. ( Bus Caught Fire in Nashik ) बसला आग लागल्यानंतर 12 प्रवासी ठार झाल्याने महाराष्ट्राला हादरा बसला होता. घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांनी दोन लाखाची मदत जाहीर केली होती, तर जखमींना 50 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.
नर्मदा नदीत बस पडून 12 नागरिकांवर काळाचा घालाअंमळनेर येथील बस इंदूरवरुन परत येत असताना नर्मदा नदीत ( Pune Bus Fell In To Narmada River 2022 ) पडल्याची घटना जुलै 2022 मध्ये घडली होती. पुलावरुन 100 फूट खोल नदीत बस पडल्याने बसमधील 12 जणांवर काळाने ( 12 People Died In Bus Accident In Narmada river ) घाला घातला होता. या बसमधील 15 प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मध्यप्रधेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा ( Minister Narottam Mishra ) यांनी दिली होती.