मुंबई- राज्यात सॅनिटायझर्सचा काही अंशी तुडवडा जाणवत असला तरी यापूढे मात्र सॅनिटायझर्सची कमतरता भासणार नाही. कारण, आत्तापर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील तब्बल 88 साखर कारखान्यांना सॅनिटायझर्स निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार या कारखान्यात लाखो लिटर सॅनिटायझर्स बनवले जात आहे. ते लवकरच बाजारात उपलब्ध होतील.
कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सॅनिटायझर्स अनिवार्य झाले आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सॅनिटायझर्सची मागणी प्रचंड वाढली आहे. पण, पुरवठा कमी असल्याने सॅनिटायझर्सची उपलब्धता कमी आहे. कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर अर्थात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सॅनिटायझर्सची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे सरकारने साखर कारखान्यांना सॅनिटायझर्स निर्मिती करण्याच्या सूचना केल्या.
तब्बल 88 साखर कारखान्यातून होणार हजारो लिटर 'सॅनिटायझर'ची निर्मिती - कोरोना
कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सॅनिटाझरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सॅनिटायझर निर्मितीसाठी आता साखर कारखान्यांनी पुढाकार घेतले असून अन्न व औषध प्रशासनानेही 88 साखर कारखान्यांना सॅनिटयझर निर्मितीची परवानगी दिली आहे.
या सूचनेनुसार राज्यातील अनेक साखर कारखाने यासाठी पुढे आले असून आता ही संख्या वाढतच चालली आहे. दरम्यान, सॅनिटायझर्स निमिर्तीसाठी एफडीएची परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे 26 मार्चपासून 8 एप्रिलपर्यंत 88 साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आहे, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त विकास बियाणी यांनी दिली. प्रत्येक साखर कारखान्याची सॅनिटायझर्स निर्मिती क्षमता वेगवेगळी असून 2 हजार लिटर ते 60 हजार लिटरी अशी ही क्षमता आहे. यापुढे ही जे कारखाने लायसन्स मागतील त्यांना लायसन्स दिली जाणार आहेत. त्यामुळे राज्यात यापुढे कुठेही सॅनिटायझर्सचा तुडवडा जाणवणार नसल्याचेही बियाणी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -डायलेसिस करताना कोरोनाची तपासणी बंधनकारक; मुंबई पालिकेचा आदेश