मुंबई - राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल संथ गतीने राहणार आहे. त्यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. राज्यात किमान ८ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता नाही.
उकाड्यापासून तुर्तास दिलासा नाहीच.. राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, हवामान विशेषज्ञांचा अंदाज - department
यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावी आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढील नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याचीही भीषण टंचाई भासत आहे. त्यातच राज्यात मान्सून लांबणीवर गेल्याने नागरिकांना आणखी आठ दिवसाची वाट पहावी लागणार आहे. ३१ मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील, परंतु १ जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये, त्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावी आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढील नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.