मुंबई - केरळमध्ये ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे. जर ६ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये आला तर महाराष्ट्रात मान्सून १० तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.
महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज - मुंबई
जर ६ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये आला तर महाराष्ट्रात मान्सून १० तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.
त्या म्हणाल्या, येत्या ३ दिवसात अरबी समुद्रात मान्सूनचे ढग अधिक जलद गतीने तयार होतील. त्यानंतर केरळमध्ये ६ जूनपर्यंत तर महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मान्सूनपूर्व पाऊस हा महाराष्ट्रातील कोकण पट्यातील काही भागात पडण्याची शक्यता आहे. मुंबईतसुद्धा २-३ दिवास ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना पावसासाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. मान्सून हा अरबी समुद्रात सक्रिय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. पण असे असले तरी महाराष्ट्रात मान्सून येण्यास अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जोपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात मान्सून कधी होणार हे सांगता येणार नाही, असेही भुत्ते यांनी सांगितले.