महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Saraswati Murder Case : पॉर्न साईट्सवर मनोज साने होता सक्रिय, डेटिंग ॲपवर साने मुलींशी करायचा चॅटिंग - डेटिंग ॲपवरून मुलींशी चॅट

सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील आरोपीची खळबळजनक माहिती आता बाहेर येत आहे. तपासात असे निष्पन्न झाले आहे की मनोज साने पोर्न साईट नियमितपणे पाहायचा. तसेच डेटिंग ॲपवरही साने सक्रिय होता.

मनोज साने
मनोज साने

By

Published : Jun 14, 2023, 10:13 PM IST

मुंबई : मीरा रोड येथे राहणाऱ्या आरोपी मनोज साने याने 4 जूनला लिव्ह इन पार्टनर आणि कथित पत्नी सरस्वती वैद्य हिची क्रूरपणे हत्या केली. तिचे तुकडे तुकडे करून ते शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले. असा किळसवाणा प्रकार करणारा आरोपी मनोज साने सध्या नया नगर पोलिसांच्या कोठडीत आहे. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी 20 ते 25 जणांचे जबाब नोंदवले आहेत. मनोज साने याची देखील चौकशी सुरू आहे. या चौकशीला साने पोलिसांना सहकार्य करत नसून पोलीसच त्याच्या मोबाईल अथवा इतर बाबींच्या आधारे तपास करत आहेत. पोलिसांना या तपासात आरोपी मनोज साने फोनवर पॉर्न सेक्स पाहण्याचा व्यसनी असल्याचे समोर आले आहे.

फोनमध्ये मुलींची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ - 16 जून पर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या मनोज सानेकडे असलेल्या मोबाईलच्या तपासणीत पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये मुलींची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे मनोज साने हा हॅजल आणि ओके क्युपिड या डेटिंग ॲपवर सक्रिय असल्याचे देखील उघडकीस आले आहे. या डेटिंग ॲपवर ज्या मुलींशी साने चॅटिंग करत असे त्या मुलींचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


मनोज साने हा पॉर्न साईटवर देखील अनेकदा भेट देत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत पोलिसांनी त्याला विचारले असता त्याने डोक्यात ते आहे तर काय करू असे उत्तर दिले. मृत सरस्वती वैद्य ही केवळ मनोज साने याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले असून ती अन्य कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे.

मृत सरस्वती वैद्य ही फार क्वचित तिच्या थोरल्या बहिणीच्या संपर्कात होती. त्यामुळे थोरली बहीण हत्येच्या काही दिवस आधी मिरा रोड येथील सरस्वतीच्या घरी आली होती. त्यावरून सरस्वती आणि मनोज साने यांच्यात जोरदार भांडण झाले होते. मनोज सानेच्या घरी कीटकनाशक भरलेली बाटली आढळून आल्याने मनोज सानेने तिला मारले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मनोज याने मिरा रोड येथूनच सुरी आणि झाडे कापण्यासाठी वापरली जाणारी करवत खरेदी केली होती. त्याचप्रमाणे सुरी धार काढण्यासाठी दिली होती, त्या व्यक्तीला सुरीला धार काढून झाली का हे विचारण्यासाठी शेवटचा कॉल मनोज सानेने केला होता. असे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच मृतदेहाचे तुकडे करताना झाडे कापण्याच्या करवतीची साखळी तुटल्याने मनोज सानेने ती रिपेअर करून पुन्हा घरी आणली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मात्र, मनोज साने डेटिंग ॲपवरून मुलींशी चॅट करायचा त्या मुलींना प्रत्यक्षात भेटला की नाही याबाबत पोलिसांना अद्याप माहिती मिळालेली नाही. त्याचप्रमाणे मृत सरस्वती वैद्य हिचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असून सविस्तर वैद्यकीय अहवाल अद्याप मिळालेला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा...

  1. Saraswati Vaidya Murder Case: मनोज साने आणि सरस्वतीने मंदिरात केले होते लग्न; बहिणीचा दावा
  2. Mira Murder case : मनोज साने डेटिंग अ‌ॅपवर होता ऍक्टिव्ह, गुगलवर सर्च करत होता 'ही' गोष्ट; सरस्वती वैद्यच्या मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
  3. Meera Road Murder: सरस्वती वैद्यच्या बहिणींना 'ते' फोटो पाहून अश्रू अनावर, कठोर शिक्षेची पोलिसांकडे केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details