मुंबई - ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी एमसीसी कॉलेज मुलुंड येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होत आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून निहरिका खोंदले निवडणूक लढवत आहेत.
नोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क मनोज कोटक हे ईशान्य मुंबईतून खासदारकीसाठी नवखे उमेदवार आहेत. शिवसेनेबरोबर असलेल्या वादात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचे तिकीट कापून भाजपने महानगरपालिकेतील नगरसेवक कोटक यांना उमेदवारी दिली. काही महिने उमेदवारी निश्चित होण्याची वाट न पाहता किरीट सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत प्रचार केला होता.
या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर उमेदवार कोटक यांच्या प्रचारात शिवसेनेचे आमदार दिसले असले तरी कोटक यांना मतदान करतील का ही शंका आहे. कोटक यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मतदारसंघात रोड शो करण्यासाठी बोलावले होते.