महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पांडुरंगाजवळ ज्या इच्छा व्यक्त करतो त्या पूर्ण होतात - मनोहर जोशी - manohar joshi

आषाढी एकादशी निमित्ताने आज वडाळा येथील विठ्ठल मंदिरात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्रातील सर्वाना पुरेसे पाणी मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाचरणी त्यांनी केली.

पांडुरंगाजवळ ज्या इच्छा व्यक्त करतो त्या पूर्ण होतात - मनोहर जोशी

By

Published : Jul 12, 2019, 1:52 PM IST

मुंबई - आषाढी एकादशी निमित्ताने आज वडाळा येथील विठ्ठल मंदिरात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्रातील सर्वाना पुरेसे पाणी मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाचरणी त्यांनी केली.


दरवर्षी दर्शनाला मी येतो आणि वंदन करतो. हे सांगण्यासाठी पूर्वी माझ्यासोबत बाळासाहेब ठाकरे असायचे, परंतु ते आता नाहीत. पण मी येतो आणि दर्शन घेतो. येथे मी ज्या इच्छा व्यक्त करतो. त्या-त्या गोष्टी मला मिळतात. पंढरपूरच्या विठुरायाचे आम्हाला आशीर्वाद लाभलेले आहेत, असेही ते म्हणाले.

मनोहर जोशी


आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात कधी येतील यावर जोशी म्हणाले, ठाकरे यांची चौथी पिढी मी पाहत आहे. या सर्व पिढ्यांकडून भक्तीभाव आहे. जर कुणी भक्ती भावा पोटी, असे सांगितले असेल, तर ते मी समजू शकतो. शिवसैनिकांनी त्यांना मदत करावी.

ABOUT THE AUTHOR

...view details