मुंबई- शिवसेनेत सध्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून नेते येत आहेत. त्यामुळे पक्ष वाढत आहे, हे पक्षासाठी चांगला आहे. पण हा पक्षाचा सुवर्ण काळ आहे का? हे निवडणुकीच्या निकाला नंतरच कळेल. उन्मेष जोशी यांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर फक्त आरोप आहेत. त्यातून काहीही सिद्ध होणारे नाही. त्यामुळे उन्मेष जोशी यातून सुखरुप बाहेर पडतील, असा विश्वास शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.
ईडी प्रकरणातून उन्मेष जोशी सुखरुप सुटणार, मनोहर जोशींनी व्यक्त केला विश्वास - कोहिनूर मिल प्रकरण
उन्मेष जोशी यांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र, त्याच्यावर फक्त आरोप आहेत. त्यातून काहीही सिद्ध होणारे नाही. त्यामुळे उन्मेश जोशी यातून सुखरुप बाहेर पडतील, असा विश्वास शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.
मनोहर जोशी
हेही वाचा-राज्यावर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची शक्ती दे , मुख्यमंत्र्यांची श्रींच्या चरणी प्रार्थना
दरम्यान, कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष यांची ईडीने सात तास चौकशी केली होती.