मुंबई- राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्लीतील मुख्यालयात फोन करून एका तरुणाने मुंबईत बॉम्ब स्फोट घडविण्याची धमकी दिली होती. या तरुणाला मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव शुभम पाल असून हा दिल्लीतील मेहरोली परिसरात राहतो.
मुंबई उडविण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद.. - एनआयए ला मुंबई उडविण्याची धमकी देणाऱ्या आरोपी जेरबंद
आरोपीला मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी गोरेगाव येथून अटक केली. काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबत वाद झाल्यानंतर शुभम मुंबईत दाखल झाला होता. आपल्या आई-वडिलांना अद्दल घडविण्यासाठी शुभमने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्ली मुख्यालयात दूरध्वनी करून मुंबईतील काही ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या युवकाला मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. ३० ऑगस्ट रोजी शुभमने कॉल केला होता.
शुभमला मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी गोरेगाव येथून अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांसोबत वाद झाल्यानंतर आरोपी मुंबईत दाखल झाला होता. आपल्या आई-वडिलांना अद्दल घडविण्यासाठी शुभमने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्ली मुख्यालयाला दूरध्वनीवरून कॉल केला होता. त्याने ३० ऑगस्ट रोजी लावलेल्या या कॉलमध्ये मुंबईतील काही ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सदर धमकीचा कॉल हा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथून केल्याचे समोर आले होते. आरोपी शुभम पाल हा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेत होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याने त्याचे शिक्षण अर्धवट सोडले होते.
मुंबईत सध्या ४० हजाराहून अधिक मोठा पोलीस बंदोबस्त कार्यरत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. अटक केलेल्या आरोपीचे मुंबईत कोणीही नातेवाईक नसताना देखील तो मुंबईत का आला, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.