मुंबई :मुंबईतल्या बोरिवलीतील वृद्ध महिलेची ३.१४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (financial fraud) केल्याप्रकरणी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. वृद्ध महिलेची ३.१४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ४४ वर्षीय शेअर ट्रेडिंग एजंटला शनिवारी बोरिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या प्रकरणात आरोपीने तक्रारदार महिला सेलिनो पिंटोची फसवणूक करत पैसे बनावट डिमॅट खात्यात वळते केल्याचा आरोप आहे.
Mumbai Crime : बोरिवलीतील वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला दिल्लीतून अटक - आर्थिक फसवणूक
मुंबईतल्या बोरिवलीतील वृद्ध महिलेची ३.१४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (financial fraud) केल्याप्रकरणी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
बोरिवलीतील वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला दिल्लीतून अटक
सेलिनो पिंटो या महिलेचे शेअर्स आरोपीने ग्लोबल कॅपिटल मार्केटिंग (Global Capital Marketing) नामक कंपनीच्या दुसऱ्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केल्याचे पोलिसांना आढळून आले. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असुन पोलीस या प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करत आहेत.