मुंबई -वाहतूक कोंडीतून रस्ता मोकळा करण्यासाठी समोरील वाहनचालकांना पिस्तूलाची भीती दाखवून कारसाठी वाट काढत असल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चागंलाच व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे चिन्ह असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी कारवाईची मागणी केली होती. या घटनेच्या चौकशीकरिता खोपोली पोलिसांनी काही प्रवाशांना चौकशीसाठी बोलावले आहे.
काही प्रवाशांना चौकशीसाठी बोलावले -
हा व्हिडीओ एम.आय.एम.चे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन शेअर केला असून यामध्ये थेट शिवसेनेवर आरोप केला होता. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन व मागे बसलेला एक सहकारी उजव्या हातात पकडलेली पिस्तूल गाडीच्या खिडकी बाहेर काढतो आणि ट्रक चालकांना धमकावत रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे जलील यांनी ट्विट मध्ये म्हटले होते. या संदर्भात खोपोली पोलीस ठाण्यात आरोपी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर खोपोली पोलिसांनी काही प्रवाशांना चौकशीसाठी बोलावले आहे.
हेहा वाचा - कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अधिकाऱ्यांंनी घेतली कोरोनाची लस