महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bombay HC : आईचा खून केल्याप्रकरणी मुलाला फाशीची शिक्षा; मात्र न्यायालयाने दिली मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी - उच्च

आईची हत्या करणाऱ्या दोषी आरोपीला मुलीच्या लग्नात हजर राहण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. 25 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात स्वतःच्या मुलीच्या लग्नाला या आरोपीला हजर राहता येणार आहे. आईच्या खून प्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Feb 20, 2023, 10:37 PM IST

मुंबई: उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. आईची हत्या करणाऱ्यादोषी मुलास फाशीची शिक्षा दिली गेली होती. मात्र सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सूनवल्यानंतर सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने दोषीला 25 फेब्रुवारी रोजी मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

काय आहे प्रकरण: दोषी ठरवले गेलेल्या मुलाने आपल्या आईचा खून केला होता. आणि या संदर्भात सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली देखील होती. मात्र स्वतःच्या मुलीचे लग्न आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हजर राहण्याची अनुमती या दोषी मुलाने मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली होती. त्यामुळे दोषीला तात्पुरता जामीन देण्यास कोर्टाचा नकार होता; तरी त्याला पोलिस बंदोबस्तासह लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी: आपल्या आईची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीला आपल्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली. महाराष्ट्र राज्य वि. सुनील रामा कुचकोरवी ह्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी व्यक्तीस स्वतःच्या मुलीच्या लग्नाला हजर राहण्याची परवानगी अखेर दिली आहे. फाशीची शिक्षा दिल्यानंतरही लग्नाला उपस्थित राहण्याची हे प्रकरण अनोखी अशी ठरली.

पोलिस बंदोबस्तात राहणार उपस्थित: न्यायालयाने आईचा खून करणाऱ्या दोषीला 23-25 ​​फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत पोलीस बंदोबस्तात बाहेर नेण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरून तो लग्नाला हजर राहू शकेल. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दोषीला पुन्हा तुरुंगात आणण्याचे आदेश देखील न्यायालयाकडून देण्यात आले. दोषी व्यक्तीला यापूर्वी ट्रायल कोर्टाने आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावली होती.

तात्पूरता जामीन देण्याची विनंती: वकील युग चौधरी यांनी नमूद केले की, आम्हाला आरोपीचा हेतू माहित नाही. त्याच्या कुटुंबालाही धक्का बसला आहे. तो एक चमत्कारिक माणूस होता,असे सर्व आजूबाजूचे लोक म्हणतात. त्याचे आधीचे रेकॉर्ड चांगले आहे. त्याला वारंवार डोकेदुखी व्हायची त्यामुळे तो दारू प्यायचा. वकील चौधरी पुढे म्हणाले, आरोपीने न्यायालयाला एका आठवड्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची विनंती केली आहे. जेणेकरून दोषी व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहू शकेल. अखेर फाशीची शिक्षा सुनावल्या गेलेल्या दोषी व्यक्तीच जामीन न देता त्याच्या मुलीच्या लग्नाच्या सोहळ्याला उपस्थित राहता येईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि पीडी नाईक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

हेही वाचा:Devkinandan Thakur: देवकीनंदन ठाकूर यांचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,' पुढील पंचवीस वर्षानंतर भारत..

ABOUT THE AUTHOR

...view details