मुंबई -वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला जबर मारहाण करीत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिला ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील वाकोला परिसरात ४ फेब्रुवारीला ही घटना घडली.
वाकोल्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतील वाकोला येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मिलिंद नगर येथील विनोद विश्वनाथ घाडी (35), सुनील सखाराम कदम वय (35) हे दोघेही 4 फेब्रुवारीला घरात दारू पित बसले होते. या दरम्यान त्यांच्या परिसरातच राहत असलेल्या एका महिलेला या दोघांनी बोलावून घेतले होते. शेजारीच असल्याने संबंधित महिला या आरोपींच्या घरात गेली. यावेळी दोघांनीही महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्यास विरोध केला. या दरम्यान दोघांनीही पीडित महिलेला जबर मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता होईल म्हणून तिच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या करण्यात आली. यानंतर या महिलेचे शव घरात सोडून दोन्ही आरोपींनी पळ काढला.
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींना शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.