महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Masturbating At Parel Station : तरुणाचे रेल्वे स्थानकावरच हस्तमैथून; मुलीने व्हिडिओ काढून केली पोलिसांकडे तक्रार - परळ रेल्वे स्थानक

मुंबईच्या परळ रेल्वे स्थानकावर एक लाजीरवाणी घटना घडली आहे. येथे एका तरुणाचा हस्तमैथून करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका तरुणीने याचा व्हिडिओ काढून ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी या ट्विट द्वारे करण्यात आली आहे.

Masturbating At Parel Station
रेल्वे स्थानकावर हस्तमैथून

By

Published : Apr 14, 2023, 10:42 PM IST

Updated : Apr 14, 2023, 11:03 PM IST

मुंबई :मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटना घडत असतात. आता मुंबईच्या परळ रेल्वे स्थानकावर एका युवकाचा हस्तमैथून करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्टेशनवरील एका मुलीने हा व्हिडिओ काढला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. दरम्यान, खाली ट्विट केलेल्या लिंकमधील व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे.

तरुणाचा विकृतपणा :गुरुवारी सायंकाळी एक तरुणी आपल्या कार्यालयातून घरी जात असताना परळ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही घटना घडली. या ठिकाणी एक विकृत तरुण उभा होता. त्यावेळी त्याने आपल्या पँटची चैन उघडून हस्तमैथुन करायला सुरुवात केली. हा प्रकार तरुणीच्या निदर्शनास आल्यावर त्या मुलीने आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. ही मुलगी पोलिसांना फोन करत असतानाच हा तरुण बाजूला आलेली लोकल ट्रेन पकडून पळून गेला.

तरुणीची सोशल मीडियावरून तक्रार : सदर तरुणीने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी या ट्विट द्वारे करण्यात आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओवर संतप्त प्रवाशांनी आरपीएफ आणि पोलिसांना टॅग केल्यानंतर आरपीएफने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटच्या प्रत्युत्तरात आरपीएफने म्हटले की, 'आज 13 एप्रिल रोजी परळ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी अश्लील कृत्य करत असल्याची तक्रार प्राप्त झाली. तक्रार प्राप्त होताच एएसआय एनआर कुंभार यांच्यासह परळ स्थानकावरील बंदोबस्त कर्मचारी दिनेश झोडिया यांनी परळ स्थानकाच्या फलाटाची पाहणी केली. तसेच स्टेशनच्या आवारात अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीची टीमने चौकशी केली. मात्र ती व्यक्ती कुठेच दिसली नाही. त्यांनी फलाटावरील प्रवाशांची आणि स्थानकाच्या आवारातील इतर लोकांचीही चौकशी केली. मात्र त्या व्यक्तीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.

हे ही वाचा :Mumbai HC On ST Cast Certificate: '1950 च्या आधी आदिवासी जमातबाबत एखादे कागदपत्र असेल तर आप्तस्वकीय पुराव्याची गरज नाही'

Last Updated : Apr 14, 2023, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details