मुंबई :एका 56 वर्षीय व्यक्तीला बुधवारी संध्याकाळी त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या आणि तिच्या शरीराचे तुकडे केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. मीरा रोड परिसरातील इमारतीत सरस्वती वैद्य आरोपीसह तीन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महिलेचा वार करून खून : प्राथमिक तपासात महिलेचा वार करून खून करण्यात आल्याचे मानण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे. सरस्वती वैद्य (३२) असे पीडित महिलेचे नाव आहे, ती तिच्या ५६ वर्षीय साथीदार मनोज सानेसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये ३ वर्षांपासून राहत होती, असे मुंबईचे डीसीपी जयंत बजबळे यांनी सांगितले. बुधवारी नयानगर पोलिस ठाण्याला इमारतीतील रहिवाशांचा फोन आला, ज्यामध्ये या दाम्पत्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
तीन दिवस मृतदेहाची लावत होता विल्हेवाट :३ जून रविवारी मध्यरात्री सरस्वती या मनोज वरती संशय घेत असल्याच्या कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेल्याने मनोज यांनी सरस्वतीची निर्घृण हत्या केली, असे मानण्यात येत आहे. त्यानंतर मागील तीन दिवस मृतदेह घरात ठेवून शरीराचे तीन तुकडे करण्यात आले. यामध्ये काही मृतदेहाचे अवशेष शिजवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतदेहाचे काही अवशेष गायब केल्याचे आढळून आले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळले. त्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. घटनास्थळावरून महिलेच्या मृतदेहाचे 12-13 पेक्षा जास्त तुकडे सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
खासदार सुळे यांनी केली आरोपीच्या फाशीची मागणी-हत्येतील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा करावी, अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मागी केली आहे. मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे खासदार सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तपासयंत्रणांनी गांभीर्य तपास करावा, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे.