महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News: भयानक! लिव्ह इन रिलेशनशिपमधील प्रियकराने रिक्षात विवाहित प्रेयसीचा चिरला गळा - पंचशीला जमादार

मुंबईतील पश्चिम उपनगरातील साकीनाका परिसरात एका व्यक्तीने सोमवारी एका चालत्या ऑटोरिक्षात एका महिलेचा गळा चिरला. नंतर त्याच शस्त्राचा वापर करून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime News
प्रियकराने गळा चिरून केली हत्या

By

Published : Jun 20, 2023, 7:17 AM IST

मुंबई :सध्या मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमधून खून झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. नुकतीच, अशीच एक घटना समोर आली आहे. साकीनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय पंचशीला जमादार असे पीडितेचे नाव आहे. ती साकीनाका येथील संघर्ष नगरमधील रहिवासी होती. ती ऑटोरिक्षातून प्रवास करत असताना त्याच वाहनातून प्रवास करणाऱ्या आरोपी दीपक बोरसे याच्याशी तिची हाणामारी झाली.



महिलेचा गळा चिरला : ऑटोरिक्षातून बाहेर पडण्यापूर्वीच बोरसे याने महिलेचा गळा चिरला. नंतर ती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. दीपक बोरसे याने घटनास्थळावरून पळ काढला. नंतर त्याच धारदार शस्त्राचा वापर करून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो केवळ मानेवर वार करू शकला आणि नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


जीवन संपवण्याचा प्रयत्न :दीपक बोरसे याने चालत्या ऑटोरिक्षात पंचशीला जमादार हिचा गळा चिरला. ती वाहनातून बाहेर पडली आणि काही अंतरावर तिच्या गळ्यावर वार केली. नंतर ती खाली पडली. बोरसेने त्याच धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीडित महिला आणि आरोपी दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. जेथे महिलेला मृत घोषित करण्यात आले, असे पुढे पोलिसांनी सांगितले.



लिव्ह इन रिलेशनशिप : महिला ज्या ठिकाणी कोसळली, त्या ठिकाणी जमिनीवर रक्त सांडलेले दिसत आहे. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू केला होता. पंचशीला जमादार ही महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. ती गेल्या काही महिन्यांपासून दीपक बोरसे या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र दोघांमध्ये भांडणाचे खटके उडू लागल्याने पंचशीला जमादार ही महिला आपल्या घरी राहण्यास गेली होती. रोजच्या कटकटीला कंटाळून पंचशीला आपल्या घरी राहण्यास गेल्याने त्या रागात दीपक बोरसे याने पंचशीला हिची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. Husband Raped On Wife : बंदुकीचा धाकाने हॉटेल वैशालीची घेतली मालकी; ड्रग्स देऊन विवाहितेवर बलात्कार, गुन्हा दाखल
  2. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरूणीचा सडलेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय
  3. Beed Murder Case: ऊसतोड मजुराचा डोक्यात दगड घालून खून; घटनास्थळी पोलीस दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details