मुबई- गणपती दर्शनासाठी आपल्याला सुट्ट्या मिळाव्या अशी अनेकांची इच्छा असते. काहीही झाले तरी देवाच्या दर्शनासाठी गावी जायचेच, असा अनेकांचा अट्टाहास असतो. मात्र शिवडा येथील साहील गावडे याने आपल्या नोकरी दरम्यान वर्षभर एकही सुट्टी घेतली नाही. याद्वारे त्याने तब्बल दोन महिन्यांच्या सुट्ट्या साठवल्या होत्या. या सुट्ट्यांचा वापर त्याने गणपती मूर्ती शाळा चालविण्यासाठी केले आहे.
....या कारणासाठी त्याने जमवल्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या - mumbai
शिवडी येथील साहील गावडे (२१) हा मुंबई विमानतळावर एअरक्राफ्ट मेंटेनंन्स इंजिनिअर म्हणून कामाला आहे. त्याने लहानपणी स्वत:ची गणपती मूर्ती शाळा असावी असे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न त्याने नोकरीला दोन महिने सुट्टी टाकून पूर्ण केले आहे. त्याने काही पैसे जमा करत यावर्षी गणपती मूर्ती शाळा सुरू केली व राहिलेले स्वप्न पूर्ण करता येतात हे दाखवून दिले.
शिवडी येथील साहील गावडे (२१) हा मुंबई विमानतळावर एअरक्राफ्ट मेंटेनंन्स इंजिनिअर म्हणून कामाला आहे. त्याने लहानपणी स्वताची गणपती मूर्ती शाळा असावी असे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न त्याने नोकरीला दोन महिने सुट्टी टाकून पूर्ण केले आहे. मुंबई एअरपोर्ट येथे कामाला असताना साहीलने काही पैसे जमा करत यावर्षी गणपती मुर्ती शाळा सुरू केली व राहिलेले स्वप्न पूर्ण करता येतात हे त्याने दाखवून दिले आहे. दिवस-रात्र काम करत त्याने सुट्ट्या जमा केल्या होत्या. या सुट्ट्यांचा वापर त्याने मूर्ती शाळा सुरू करण्यासाठी केले. आपण लहानपणी बघितलेल्या स्वप्नांचा खून न करता साहीलने जिद्दीने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
मला लहानपणापासूनच गणपती मूर्तीबद्दल आकर्षण होते. मनाशी ठरवले होते की मोठा झाल्यावर माझी स्वतःची मुर्ती शाळा असेल. मी पुढे शिकत गेलो, इंजिनिअर झालो. मात्र माझे स्वप्न अपूर्ण राहीले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई विमानतळावर मेंटेनेस इंजिनिअर म्हणून कामाला लागलो. मात्र एका दिवशी ठरवले की आपण काही पैसे जमा करून आपले राहिलेले स्वप्न पूर्ण करावे. त्यानुसार, यावर्षी मी मूर्ती शाळेची स्थापना केली असल्याचे साहीलने सांगितले.