मुंबई Man Dies On Shooting Sets : मालिकेच्या सेटवर विजेचा धक्का लागून एका क्रू मेंबरचा मृत्यू ( Mumbai Crime ) झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. महेंद्र यादव असं या क्रू मेंबरचं नाव आहे. ही घटना गोरेगाव चित्रनगरीच्या परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मालिकेच्या सेटवर काम करत होता क्रू मेंबर :एका दैनंदिन मालिकेच्या सेटवर महेंद्र यादव हा काम करत होता. मात्र काम करत असताना महेंद्र यादवला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यामुळे त्याला तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र महेंद्र यादव याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.
मृताच्या नातेवाईकाला द्यावी 50 लाखाची भरपाई :मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या क्रू मेंबरला विजेचा धक्का लागल्यानं महेंद्र यादव यांचा मृत्यू झाल्यानं परिसरात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे मालिकेच्या सेटवर असलेल्या क्रू मेंबरनी मोठा संताप व्यक्त केला. महेंद्र यादवनं या विजेचं धक्क्यानं आपली जीव गमावला आहे. त्यामुळे महेंद्र यादवच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयाची भरपाई सरकारच्या वतीनं देण्यात यावी अशी मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी केली.
निर्माता, प्रॉडक्शन हाऊसवर करा गुन्हा दाखल :विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू झाल्यानं ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले. या पदाधिकाऱ्यांनी महेंद्र यादव यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयाची भरपाई देण्याची मागणी केली. महाराष्ट्र सरकारनं महेंद्र यादवच्या कुटुंबीयांना तत्काळ भरपाई द्यावी, यासाठी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या मालिकेच्या निर्माता आणि प्रॉडक्शन हाऊसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी केली आहे.
हेही वाचा :
- Mumbai Crime : पायावर पाय दिल्याच्या वादातून ६५ वर्षीय वयोवृद्धाला मारहाण, जागीच मृत्यू