मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्णीरोड स्थानकावर मोबाईल चोराचा पाठलाग कराताना चालत्या ट्रेनमधून उडी घेतलेल्या एका प्रवाशाचा फलाट आणि लोकलमध्ये सापडून मृत्यू झाला. शकील शेख (53) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
VIDEO : मोबाईलसाठी चोराचा पाठलाग बेतला जीवावर, लोकल अन् फलाटात सापडून एकाचा मृत्यू - Mobile theft
मोबाईल चोराचा पाठलाग करताना चालत्या ट्रेनमध्ये वेगाचा अंदाज न आल्याने फलाट व लोकलमध्ये सापडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. शकील शेख (५३) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
शकील शेख रविवारी सकाळी कामानिमित्त जोगेश्वरीहून चर्चगेट स्थानकाच्या दिशेने ट्रेनने प्रवास करीत होते. यावेळी त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या मोबाईल चोराने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला. मोबाईल चोराचा पाठलाग करताना शकील शेख यांनीसुद्धा चालत्या ट्रेनमधून उडी मारली. मात्र, त्यांना लोकलचा वाढलेला वेग लक्षात न आल्याने त्यांचा फलाट व ट्रेनमध्ये अडकून मृत्यू झाला. चर्णी रोड रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.
मृत शकील शेख यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून त्यांच्या घरात पत्नी आणि दोन मुले, असे कुटुंब आहे. रेल्वे पोलिसांनी यासंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.