मुंबई : कांदिवली येथेपार्किंगचा वाद इतका शिगेला पोहोचेल, असे स्वप्नातही डॉक्टर मुलाला वाटले नव्हते. कांदिवली येथे डॉक्टरच्या वडिलांचा त्यांच्या वादातून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी पार्किंगवरून भांडण करणाऱ्या राजेश पाटील या शेजाऱ्यावर चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पश्चिम येथे आशा सुभाष बोराडे ( वय ५७) या राहतात. त्यांचा मुलगा स्वप्नील ( वय ३७) हा भगवती हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. तसेच तळमजल्यावर एका कुरिअर कंपनीला त्यांनी गाळा भाड्यावर दिला आहे.
गाडी पार्किंगवरून भांडण केले :२१ एप्रिलला दुपारी भाडेकरूचा सुरक्षारक्षक रंजनकुमार याच्यासोबत शेजारी राहणाऱ्या पाटील यांनी गाडी पार्किंगवरून भांडण केले. त्याबाबत आशा यांनी पती सुभाष यांना फोन करून सांगितले. तेव्हा सुभाष यांनी पाटीलच्या विरोधात चारकोप पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पाटील बाहेरून परत आल्यावर सुभाष त्यांना भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेले. त्या दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन हाणामारीवर गेले. या दरम्यान पाटील यांनी सुभाष यांना जोरात धक्का मारून खाली पाडले. सुभाष यांनी पोलीस नियंत्रण कक्षावर कॉल करत पुन्हा तक्रार दिली.