मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून त्याचे शिवसैनिकांनी मुंडन केल्याची घटना रविवार (दि. 22 डिसें) वडाळा येथे घडली आहे. वडाळ्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यामुळे त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्याला मारहाण केली. तसेच शाखाप्रमुख समाधान जुगदर शाखाप्रमुख प्रकाश हसबे व इतर शिवसैनिकांनी मारहाण करत त्याचे टक्कल केले आहे.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जामियाच्या घटनेची तुलना जालियावाला बागशी केली होती. याबाबत फेसबूकवर त्या वक्तीने विरोध केला होता. या प्रकारणी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षाला 149 ची नोटीस दिली आहे.