महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News : हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या इसमाकडे सापडले पिस्तूल

मुंबईतील बोरिवली परिसरातील एका हॉटेलमध्ये शेप म्हणून काम करणाऱ्या इसमाकडे पिस्तूल सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी अंधेरीतील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष 8 ने ही कारवाई करत त्या इसमास अवैध शस्त्रासह ताब्यात घेतले. संतोष हेमंत कुमार (वय 43 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Illegal Pistol Found
पिस्तुल

By

Published : Jul 23, 2023, 9:17 PM IST

मुंबई: अंधेरीतील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष 8 ने कारवाई करत बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमास जेरबंद केले आहे. संतोष हेमंत कुमार (वय 43 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटकमधील असून बोरिवलीतील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. गुन्हे शाखेचा कक्ष-8 या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

शेफला बेकायदेशीर शस्त्रासह अटक:अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कक्षाकडून अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविषयी माहिती प्राप्त करून कारवाई सुरू करण्यात आली होती. 22 जुलैला कक्ष-८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एक इसम अग्निशस्त्रासह अंधेरी पूर्व परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. या आधारे पोलिसांनी अंधेरी स्टेशन जवळील मॅकडोनाल्ड उपहागृह येथे सापळा रचून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास चलाखीने ताब्यात घेतले.

अंगझडतीत आढळले 'हे' साहित्य:पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्टूल, मॅगझिनसह व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. सापडलेले अग्निशस्त्र हे अवैधरित्या बाळगल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे संतोष या आरोपी विरुध्द अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह ३७ (१), (अ) १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कक्ष ८, गुन्हे शाखा करीत आहेत. अटक आरोपी संतोष कुमार हा बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो. तो पिस्तुलीचा धाक दाखवून धमकावण्याचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात मिळाली आहे.

बुलडाण्यात अवैध शस्त्रसाठा जप्त: अवैध शस्त्रसाठा जप्तीसाठी गुन्हे शाखा वेळोवेळी कारवाई करत असते. अशीच एक मोठी कारवाई बुलडाणा जिल्ह्यात 9 जून, 2023 रोजी बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आली होती. बुलडाण्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अवैध पिस्टल माफियांचा हब तयार होतो आहे. ठाणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांनी ठाण्यातील राबोडी पोलीस ठाणे अंतर्गत दोन जणांना 3 पिस्टल, 6 मॅक्झिन आणि 4 जिवंत काडतुसांसह अटक केली होती. अधिक तपासात ठाणे गुन्हे शाखेकडून बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस ठाणे हद्दीतील टूनकी गावातून एका महिलेच्या घरातून तब्बल 14 पिस्टल, 25 मॅक्झिन आणि 8 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा:

  1. Firing At Drinking Party : गुन्हेगारांच्या पार्टीत झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी, आरोपी फरार
  2. Nagpur Crime News : ऑनलाइन गेमचा नाद नको रे बाबा! नागपूरच्या व्यापाऱ्याने गमावले तब्बल 58 कोटी रुपये
  3. West Bengal Violence: मणिपूर पाठोपाठ... पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, दोन महिलांना बेदम मारहाण करून नग्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर

ABOUT THE AUTHOR

...view details