महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक - Mumbai girl Sexual assault case

ओशिवारा येथील एका हा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणी वेगात तपास करून पोलिसांनी तीन तासात आरोपीला अटक केले. आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Mumbai Sexual assault case
मुंबई मुलगी लैंगिक अत्याचार बातमी

By

Published : May 1, 2021, 10:58 AM IST

मुंबई - ओशिवारामध्ये एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनील नावाच्या व्यक्तीला अटक केले.

मुंबईत सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एकाला अटक करण्यात आले

अशी आहे घटना -

गुरूवार सायंकाळी पीडित मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. मुलीच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळानंतर मुलगी रडत-रडत घरी आली. आईने विचारणा केली असता गुप्तांगामध्ये वेदना होत असल्याचे तिने आईला सांगितले. तिच्या गुप्तांगामधून रक्त येत असल्याचे आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ मुलीला घेऊन आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तीन तासात केले आरोपीला अटक -

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस आरोपीला पकडण्यासाठी दाखल झाले असता त्याने पळ काढला. मात्र, वेगाने तपास करून तीन तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केले.

ABOUT THE AUTHOR

...view details