महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Women Doped For Marriage In Thane : लग्नाचे आमिष दाखवत 26 महिलांची अडीच कोटीने फसवणुक करणारा लखोबा अटकेत

देशभरात वेगवेगळ्या ठिकाणच्या विधवा घटस्फोटित महिलांशी (Widows with divorced women) संपर्क साधुन त्यांचा विश्वास संपादन करून लग्नाचे आमिष देत संबंध ठेवणारा सोबतच त्यांची आर्थिक फसवणुक (Financial Cheating) करणाऱ्या आधुनिक लखोबास ठाणे पोलिसांनी (Thane Police) बेड्या ठोकल्या आहेत. मेट्रोमोनीयल साईटवरून तो अशा महिलांशी संपर्क साधायचा. न्यायालयाने त्याला २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

By

Published : Dec 17, 2021, 10:22 AM IST

Updated : Dec 17, 2021, 12:19 PM IST

Man Arrested in Thane
महिलांना फसवणारा लखोबा अटकेत

ठाणे : देशभरातील वेगवेगळ्या शहरात महिलांना अमिष देत त्यांची फसवणारा आरोपी पराजित जोगिश केजे उर्फ पराजित तयल खलिद उर्फ प्रजीत टी के (४४) रा. ताईल हाऊस, ओडतिनगम माही, जि. पाँडिचेरी याला पोलिसांनी ठाण्यातुन अटक केली आहे. त्याच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

लखोबा अटकेत
आरोपी पराजित जोगिश केजे हा या महिलांना पॅरिसमध्ये हॉटेल आहे, आरबीआय बँकेत पैसे अडकले आहेत असे सांगायचा. महिलांना गोड बोलून त्याच्याशी जवळीक साधून क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे महागड्या वस्तू खरेदी करीत होता. याबाबत कुठलाही पुरावा मागे सोडत नव्हता. त्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरायचा. असे प्रकार करत त्याने मुंबई, केरळ, बंगलोर, कलकत्ता अशा विविध ठिकाणच्या २६ महिलांची २ कोटी ५८ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे समोर आले आले. या रकमेचा आकडा जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तांत्रिक तपास करत पोलिसांनी त्याला अटक केली न्यायालयाने त्याला २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तो महिलांना दुप्पट पैसे देण्याचे अमिश दाखवून, वेळप्रसंगी लग्नाचे आमिषही द्यायचा. या गुन्ह्यात आणखी दोनजन आरोपी आहेत.
Last Updated : Dec 17, 2021, 12:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details