मुंबई :प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कर्करोगानंतर आता आणखी एका गंभीर आजाराशी लढत आहे. अभिनेत्री ममता मोहनदासने तिच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. तिने रविवारी तिचे काही सेल्फी शेअर करत चाहत्यांना तिच्या आजाराबद्दल सांगितले. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्याचा रंग बदललेला दिसत आहे.
शेअर केला सेल्फी आणि म्हणाली : शेअर केलेल्या फोटोंमध्ये ममता मोहनदास बसलेली दिसत आहे. तिच्या हातात एक कप आहे. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट, टाइट्स आणि जॅकेट घातले आहे. या फोटोंबरोबर तिने एक मोठे कॅप्शन दिले आहे. प्रिय सूर्या, मी आता तुला मिठी मारते, जशी मी यापूर्वी कधीच मारली नाही. चेहऱ्यावर बरेच डाग आहेत, मी माझा रंग गमावत आहे. मी सकाळी तुझ्या आधी उठते. धुक्यातून तुझे पहिले किरण निघताना पाहण्यासाठी. तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे… मी आजपासून कायमची तुझी ऋणी आहे. असे कॅप्शन ममताने दिले आहे. या फोटोंना तिने कलर, ऑटोइम्यून डिसिज व्हिटिलिगो आणि सनलाइट असे हॅशटॅग दिले आहे.
ममताला झाला होता कर्करोग :ममता मोहनदास ही मल्याळम अभिनेत्री असून कॅन्सरमधून वाचलेली आहे. काही वर्षांपूर्वी तिला पुन्हा कर्करोग झाला होता. त्यानंतर तिने अमेरिकेत उपचार घेतले होते. २०१४ मध्ये एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, मी असे म्हणू शकत नाही की मी या आजारापूर्वी जितकी मजबूत होते, तितकी आज आहे. आधी मी कशाचीही चिंता करायचे नाही. कोणतीही समस्या असली तरी मी घाबरायचे नाही. पण आयुष्यात पहिल्यांदाच मी घाबरले. सकारात्मक राहा, हे सांगणे सोपे आहे. पण आत्ता मला वाटते की घाबरलेले असायला काहीच हरकत नाही, असे ममता म्हणाली होती.
व्हिटिलिगो नेमके काय आहे ?विटिलिगो हा एक त्वचेसंदर्भातला आजार आहे. यामध्ये पीडीत व्यक्तीच्या त्वचेचा रंग उडू लागतो. शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात आणि ते कालांतराने वाढतात. ऑटोइम्यून डिसीजमध्येही व्हिटिलिगोचा समावेश होतो.
हेही वाचा : Sunil Holkar Passed Away : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता सुनील होळकर यांचे निधन